JEE Main 2021 : NTA नं वाढवली ‘जेईई मुख्य परीक्षे’साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, आता ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक मोठा निर्णय घेत संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मुख्य परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. आता उमेदवार जेईई मुख्य परीक्षा 2021 फेब्रुवारीच्या सत्रासाठी 23 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. जर हे एक्सटेंशन मिळाले नसते तर जेईई परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आज 16 जानेवारी 2021 होता. इंजिनिअरिंग कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार आता 23 जानेवारीपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी एनटीए जेईई मुख्य परीक्षा 2021 च्या अधिकृत वेबसाइटचा अ‍ॅड्रेस आहे – jeemain.nta.nic.in.

चार सत्रात घेण्यात येईल परीक्षा

यावर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी चार सत्रांमध्ये जेईई मुख्य परीक्षा घेणार आहे. परीक्षा आयोजनाचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे महिने आहेत. जेव्हा जेईई मुख्य परीक्षा 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल त्यानंतर आयआयटी खडगपूरद्वारे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 2021 आयोजित केली जाईल. ही परीक्षा 03 जुलै 2021 रोजी घेण्यात येईल.

जे उमेदवार अद्याप कोणत्याही कारणास्तव या परीक्षेसाठी अर्ज करू शकलेले नाहीत, ते या संधीचा फायदा घेऊन आता अर्ज करू शकतात. जेईई परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन 16 डिसेंबर 2020 रोजी सुरू झाले होते आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2021 होती, जी आता वाढवून 23 जानेवारी करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या वेबसाइटशिवाय उमेदवार nta.ac.in वर देखील अर्ज करू शकतात. यावर्षीच्या फेब्रुवारी सत्राच्या परीक्षा 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात येतील.

अर्ज कसा करावा –

– जेईई मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजेच jeemain.nic.in वर जा.
– येथे त्या लिंकवर क्लिक करा ज्यावर लिहिले असेल – Apply for JEE Main February 2021.
– डाव्या बाजूस fresh user टॅबखाली एक लिंक असेल procced to apply, त्यावर जा आणि क्लिक करा.
– असे केल्याने एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याकडून ज्या डिटेल्स मागितल्या जातील, त्या प्रविष्ट करून रजिस्टर करा.
– आता आपला फोटो स्कॅन करून अपलोड करा.
– शेवटी फी जमा करुन अर्ज सबमिट करा.
– अर्ज क्रमांक आणि रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याकडे सांभाळून ठेवा. भविष्यात याची आवश्यकता पडेल.