‘NEET’ परीक्षेत ५ मार्कांचा घोळ, विद्यार्थी : शिक्षक न्यायालयात जाणार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – नीट परीक्षेचा आज निकाल लागला. मात्र या परीक्षेत हक्काचे ५ गुण कमी झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.

२९ मे रोजी नीट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली होती. त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यासोबत उत्तरसंच देण्यात आला. मात्र त्यात एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ५ गुण कमी झाले आहेत.

राज्यात सर्वाधिक २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. त्यापैकी ८१ हजार १७१ परीथार्थी उत्तीर्णी झाले होते. मात्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ५ गुणांचा फटका बसला आहे. त्याविरोधात लातूरच्या रेणूकाई केमीस्ट्री क्लासेसचे संचालक मोटेगावकर न्यायालयात याविरोधात दाद मागणार आहेत.

Loading...
You might also like