वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा आज निकाल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – NTA द्वारे घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा म्हणजेच NEET चा निकाल आज लागणार आहे. विध्यार्थ्यांना ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेब साइटवर निकाल पाहता येणार आहे.

NEET ची प्रवेश परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली होती. परंतु ओडिसा आणि कर्नाटकात मात्र फानी चक्रीवादळाच्या थैमानामुळे 20 मे रोजी NEET परीक्षा घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेची उत्तरे यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. मात्र आज त्यांच्या या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.

You might also like