ब्रेकिंग ! नेट परिक्षांचा निकाल जाहीर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला. देशभरातून 60 हजार 147 जणांनी सहायक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधक पदासाठी परिक्षा दिली होती. या परिक्षेत केवळ 5 हजार 92 उमेदवार उत्तीर्ण झाले असून परिक्षेचा निकाल केवळ सहा टक्के लागला आहे.

देशभरातून 2 ते 6 डिसेंबर 2019 दरम्यान 299 शहरांमध्ये 700 केंद्रावर नेटची ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 10 लाख 34 हजार 872 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 7 लाख 93 हजार 813 उमेदवारांनी परिक्षा दिली होती.

या परिक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी 1 हजार 450 सीसीटीव्ही आणि 3 हजार 100 जॅमर परिक्षा केंद्रावर वापरण्यात आले होते. युजीसीच्या धोरणानुसार दोन्ही विषयांच्या परीक्षा देऊन त्यात किमान सरासरी गुण मिळवलेल्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात येते. त्यानुसार 7 लाख 93 हजार 813 उमेदवारांपैकी केवळ 6 हजार उमेदवार परिक्षेला पात्र ठरले होते. परिक्षेचा सविस्तर निकाल ugcnet.nta.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/