अभिनेत्री सारा अली खाननं सांगितलं, ‘ते’ मी आईकडून शिकलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अमृता सिंह यांनी 2 स्टेट्स आणि अलिकडेच आलेल्या बदला या सिनेमात काम केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या. सध्या अमृता आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने स्वत:च्या दमावर आणि अभिनयाच्या जीवावर स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. सारादेखील आईच्या शिकवणीला प्रमाण मानत भूमिकांची निवड करते. साराने स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. भूमिकेच्या निवडीची प्रक्रिया मी आईकडून शिकले आहे असे साराने म्हटले आहे.

मुलाखतीत बोलताना सारा म्हणाली की, “कोणताही सिनेमा किंवा भूमिका निवडताना ती भूमिका वास्तववादी असणं, तशी साकारता येणं सिनेमा तयार झाल्यावरही त्यात ती तशीच असणं आवश्यक असतं. असं झालं, तरंच रसिकांना ती भूमिका पटते. नाहीतर प्रेक्षकांना तु्म्ही फेक वाटू शकता. म्हणूनच भूमिकेच्या निवडीची प्रक्रिया ही मी आईकडून शिकले आहे. तिची प्रत्येक भूमिका तशीच आहे.”

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान आपल्या दोनच सिनेमाने स्टार बनली. सिम्बा आणि केदारनाथ यांसारखे सक्सेसफुल सिनेमे करणाऱ्या साराकडे आज अनेक मोठे सिनेमे आहेत. अवघ्या दोनच सिनेमात साराने दाखवून दिले की, ती काय आहे ते. खूप कमी वेळात साराने स्वत:ची वेगळी जागा तयार केली आहे. साराचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्पॉट झाल्यानंतर अनेकदा सारा अली खान चर्चेत आली आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?