Nude Photography | ‘न्यूड फोटोग्राफी’ ही कला नाही का? पुण्यातील ‘बालगंधर्व’मध्ये प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) बालगंधर्व येथील कला दालनात (Balgandharva Art Gallery) तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे (Nude Photography) प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालगंधर्व प्रशासनाने देखील हा प्रकार पाहता तरुणाने भरवलेले प्रदर्शन अचानक बंद केले आहे. अक्षय माळी (Akshay Mali) या तरुण कलाकाराने बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात तीन दिवसाचे प्रदर्शन (Exhibition) भरवले होते. व्यवस्थापनाने कोणाच्या तरी दबावाखाली राहून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास बंदी केल्याचे अक्षयने म्हटले आहे. (Nude Photography)

 

मुळचा साताऱ्याचा असलेल्या अक्षय याने पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफी (Symbiosis School of Photography) मधून शिक्षण घेतलं आहे. पुण्यात आतापर्यंत न्यूड फोटोग्राफिचे प्रदर्शन कधी झाले नाही. पुण्यात आतापर्यंत न्यूड फोटोग्राफिचे प्रदर्शन कधी झाले नाही. समाजाचा न्यूड फोटोग्राफी किंवा चित्रकला (Painting) याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलण्यासाठी अक्षयने ही नवी संकल्पना आणली होती. पण ही कला वाईट आहे, असे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आंदोलनाची धमकी (Threat) देऊन प्रदर्शन बंद पाडल्याचे त्याने सांगितले. (Nude Photography)

चित्रे केली उलटी
अक्षयने सांगितले की, 7 जानेवारीला मी हे न्यूड फोटोग्राफी चे प्रदर्शन भरवले होते.
त्यानंतर 8,9 असे तीन दिवस ते सुरु राहणार होते. मात्र पहिल्याच दिवशी अज्ञात नंबर वरून फोन आला.
हे असलं प्रदर्शन दोन मिनिटात बंद करा, अन्यथा आंदोलन (Agitation) केले जाईल, अशी धमकी दिली.
यानंतर बालगंधर्व व्यवस्थापनानेदेखील दुसऱ्या दिवशी पासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही.
आता मी लावलेली सर्व चित्रे उलटी करुन ठेवल्याचे अक्षयने सांगितले.

 

Web Title :- Nude Photography | nude photography isnt art Akshay Mali threatened agitation after demonstration shocking type balgandharva rang mandir of puen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rajesh Tope | राज्यात लॉकडाऊन होणार नाही? राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

 

Coronavirus Restrictions | सगळं सुरु मग ब्युटी पार्लर आणि जीम का बंद? वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

 

Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज

 

Chandrakant Patil | ‘हे सरकार गेंड्यापेक्षा ही जास्त असंवेदनशील’ ! राज्यातील निर्बंधावरुन चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या