राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांवर 38 जागांसाठी भरती, जाणून घ्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 38 जागांवर अर्ज मागवण्यात आले. अर्ज पोहचण्याच्या आणि मुलाखतीच्या 2, 3, 4, 6 फेब्रुवारी 2020 अशा तारखा आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

पद आणि पदांची संख्या –

1. स्टाफ नर्स (15 जागा) –
12 वी पाससह जी. एन. एम कोर्स, एम. एन. सी मध्ये नोंदणी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

2. ए. एन. एम.  (19 जागा) –
12 वी पाससह जी. एन. एम कोर्स, एम. एन. सी मध्ये नोंदणी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

3. फार्मासिस्ट  (2 जागा) –
12 वी पाससह शासकीय नोंदणीकृत संस्थेतून बी. फार्म पदवी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

4. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक  (1 जागा) –
कोणत्याही शाखेतील पदवी, MSCIT उत्तीर्ण, टंकलेखन वेग मराठी, इंग्रजीसाठी 30 श. प्र. मि

वरील पदांसाठी वयोमर्यादा – 38 वर्ष (राखीव पदांसाठी)

5. वैद्यकीय अधिकारी  (1 जागा) –
एम. बी. बी. बी. एस पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य

वरील पदासाठी वयोमर्यादा – 60 वर्ष

परिक्षा शुल्क –
उमेदवाराला अर्ज केल्यानंतर परिक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही

वेतनमान –
8,400 ते 45,000 रुपये

नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवाराला औरंगाबादमध्ये नोकरी करावी लागेल.

मुलाखत आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता –
औरंगाबाद शहर आरोग्य समिती, डाटा सेंटर, सिव्हिल मार्बल बिल्डिंग, औरंगपुरा, औरंगाबाद

अर्जदार http://www.aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx या वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रत मिळवू शकतात आणि हा अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवण्यात यावा.