निर्भयाची आई आशादेवी लढवणार CM केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘निर्भया’ची आई आशादेवी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवू शकतात. माहिती मिळत आहे की निर्भयाची आई काँग्रेसच्या तिकिटावर केजरीवाल यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. याची घोषणा लवकरच होऊ शकते.

निर्भया प्रकरणातील दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला उशीर होत असल्याचे सांगत निर्भयाच्या आईने अनेकदा केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. या दरम्यान आशादेवी असेही म्हणाल्या की सरकार दोषींना वाचवू इच्छित आहे.

दिल्ली निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल म्हणाले की दिल्ली सरकारमध्ये सर्व कामे काही तासात पूर्ण केली जातात. आम्ही या संबंधित कोणत्याही कार्यात उशीर केला नाही. केजरीवाल म्हणाले की आम्हाला वाटते की दोषींना लवकरात लवकरत फाशी व्हावी.

तर आशादेवी म्हणाल्या की हे पूर्णत: चूकीचे आहे. त्यांनी वेळेत कामं केली नाहीत. निर्भयाच्या आईने आरोप केला की घटनेला 7 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. पुनर्विचार याचिका रद्द होऊन 18 महिने झालेत. जे काम सरकारने करायला हवे होते ते आम्ही केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like