Consumer Right : ‘खरेदी’ करताना लक्षात ठेवा सरकारच्या ‘या’ गोष्टी, तुमचं कधीही होणार नाही ‘नुकसान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याच वेळा बाजारातील चकाकीपणामुळे आपण वस्तू खरेदी करतो पण जेव्हा त्या वस्तू घरी आणतो तेव्हा डोक्याला हात लावून घेतो. बर्‍याच वेळा वस्तू खराब निघतात आणि आपल्याला फसवण्यात आले असे ग्राहकाला वाटते, परंतु अशा परिस्थितीत आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. जर ग्राहकाने सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या या गोष्टींकडे लक्ष दिले तर कधीही नुकसान होणार नाही. खरेदी दरम्यान ग्राहकांनी कसे जागृत राहावे आणि कोणत्या नियमांचे पालन करावे हे जाणून घेऊया.

भारत सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय वेळोवेळी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी नियम व कायदे जारी करत असते. म्हणून जेव्हा जेव्हा खरेदी कराल तेव्हा स्वत:ला जागरूक करण्यासाठी आपण याचा अभ्यास करत राहिला पाहिजे.

सर्व प्रथम खरेदी करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एमआरपीपेक्षा कधीही कोणत्याही दुकानदाराला जास्त पैसे देऊ नका. जर एखादा दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर ताबडतोब तक्रार करा. कोणताही दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीला माल विकू शकत नाही. हे बेकायदेशीर आहे.

जर आपण आपल्या नवजात बाळासाठी दुधाची बाटली घ्यायला जरी जात असाल तर हे लक्षात ठेवा की आयएसआय मार्कशिवाय बाटली कधीही खरेदी करू नये. वास्तविक लहान मुलांच्या बाटल्यांसाठी वापरला जाणारा कच्चा माल बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो.

गाडीत पेट्रोल टाकताना रिडींग झिरो आहे की नाही ते तपासले पाहिजे. रिडींग झिरो असेल तेव्हाच आपल्या गाडीमध्ये तेल टाकावे. आपण असे न केल्यास नुकसान होऊ शकते.

– लीगल मेट्रोलॉजी विभागाचे काम ग्राहकाला योग्य वजन आणि मोजमापांची माहिती देणे हे आहे. आपल्या खरेदी केलेल्या उत्पादनाचे अचूक वजन न आढळल्यास ते विभागात तपासले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, ग्राहकांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा दुकानदाराची मोजमाप साधने योग्य काम करत असतील तेव्हाच त्याच्याकडून वस्तू खरेदी करा.

आजकाल बाजारात पाण्याच्या अनेक प्रकारच्या बाटल्या विकल्या जात आहेत, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने आयएसआय मार्क असलेली पाण्याची बाटली घ्यावी. त्याच वेळी पॅकेज प्रॉडक्ट खरेदी करताना त्याचे वजन जरूर वाचले पाहिजे, जेणेकरून आपल्याला खरेदी केलेल्या वस्तूंचे वास्तविक वजन कळेल.

बर्‍याच वेळा ग्राहक वस्तू खरेदी तर करतात, पण दुकानदाराकडून याचे बिल घेत नाहीत. दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तूचे मूळ बिल घेणे आवश्यक आहे. याशिवाय ऑनलाईन व्यवहारातही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि प्रयत्न हाच असावा की पेमेंट ऑनलाईन भरले जावे जेणेकरुन तुमच्याकडे बँकिंग पेमेंटचा पुरावाही असेल.