LPG Cylinder Subsidy : बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सिलेंडरची सबसिडी जमा होते किंवा नाही, घरबसल्या ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी बँक खात्यात जमा झाली किंवा नाही हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. तर काहींची सबसिडी जमा न झाल्याची तक्रार सुद्धा असते. सबसिडीविषयी जाणून घेणे खुप सोपे आहे. सरकारने व्यवस्था केली आहे की, लोकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून समजू शकते की, त्यांच्या खात्यात सबसिडीची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही, झाली असेल तर किती रूपये. जाणून घ्या…

एलपीजी सबसिडीची स्थिती जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

सर्वप्रथम Mylpg.in वेबसाइट वर जा. येथे तिनही पेट्रोलियम कंपन्यांच्या (एचपी, भारत आणि इण्डेन) लोगोचे टॅब दिसतील. आपल्या सिलेंडरच्या कंपनीवर क्लिक करा.

नवीन पेज उघडेल, ज्यावर बार मेन्यूमध्ये जा आणि आपला 17 अंकांचा एलपीजी आयडी नोंद करा. जर एलपीजी आयडी माहित नसेल तर, क्लिक हिअर टू नो यूअर एलपीजी आयडीवर क्लिक करा, तिथे सांगितलेल्या स्टेप पूर्ण केल्यानंतर तो समजू शकतो.

येथे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, एलपीजी ग्राहक आयडी, राज्याचे नाव, वितरकाची माहिती नोंदवा. कॅप्चाकोड नोंदवल्यानंतर प्रोसेस बटनवर क्लिक करा. जे नवीन पेज उघडेल, त्यावर तुमचा एलपीजी आयडी स्पष्ट दिसला पाहिजे.

एका पॉप-अपवर तुमच्या खात्याची माहिती दिसून येईल. येथे बँक खाते आणि आधार एलपीजी खात्याशी लिंक केले किंवा नाही हे सांगितले जाईल. सोबतच ही सुद्धा मााहिती मिळेल की, तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे किंवा नाही.

पेजच्या डावीकडे सिलेण्डर बुकिंग हिस्ट्री / सबसिडी ट्रान्सफर पहा वर क्लिक करा. येथे तुम्ही सबसिडी रक्कम पाहू शकता. येथे मागील महिन्यात मागवलेला सिलेंडर आणि त्याबदल्यात तुमच्या खात्यात जमा झालेली सबसिडीची रक्कम दिसून येईल. एकदा लॉग इन केल्यानंतर सबसिडीबाबत जाणून घेणे सोपे जाते.