Weather Alert : बंगालच्या खाडीत तयार होईल चक्रीवादळ, 9 ते 11 ऑक्टोबरला ‘या’ राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज

नवी दिल्ली : बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळ सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याचा परिणाम दिसण्यास सुरूवात होईल. भारतीय हवामान विभागाने ताज्या अंदाजात म्हटले आहे की, 9 ते 11 ऑक्टोबरला उत्तर भारतात काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत तेलंगणात जोरदार पाऊस होऊ शकतो. यानंतर पुढील दोन दिवसात दक्षिण भारतात हा क्रम दिसेल.

16 ऑक्टोबरला एक नवीन मौसमी सिस्टम बंगालच्या खाडीत तयार होत आहे. ही ऑक्टोबर महिन्यातील तिसरी सिस्टम असेल. 9 आणि 10 ऑक्टोबरला बंगालच्या दक्षिण-पूर्व खाडीत पूर्व अंदमान सागर आणि त्याच्या लगतच्या उत्तर अंदमान समुद्राची स्थिती खुप संवेदनशील होईल. 10 आणि 11 ऑक्टोबरला पश्चिम बंगालच्या खाडीत, बंगालच्या उत्तर खाडीसह आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारा प्रभावी होईल.

या राज्यात 11 आणि 12 ऑक्टोबरला जोरदार पाऊस
अंदमान निकोबार आणि पूर्व केंद्रीय बंगालच्या खाडीत तयार झालेले चक्रीवादळ 9 ऑक्टोबरला कमी दाबात रूपांतरित होईल. याच्या 24 तासानंतर पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर 11 ऑक्टोबर सायंकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसाच्या किनार्‍यावरून सपाट भाग पर करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

याच्या प्रभावामुळे 11 आणि 12 ऑक्टोबरला मालकानगिरी, कोरापुट, गजपती, रायगडा आणि गंजाम जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे पुरी, कंधमाल, खुर्दा, जगतसिंहपुर, कालाहांडी आणि नवरंगपुर जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो. अशा स्थितीत हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.

किनारी भागात 45 ते 50 कि.मी. च्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशावेळी समुद्रात जाणार्‍या मच्छिमारांना 10 ऑक्टोबरपर्यंत परत येण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 11 ऑक्टोबरला मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागने दिला आहे. मात्र, पुढील दोन दिवसात राज्यात पाऊस होण्याची शक्यता खुप कमी आहे.

हवामान विभागानुसार 9 ऑक्टोरपासून बंगाल खाडीत पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाब पुढील 24 तासात डीप डिप्रेशनमध्ये बदलू शकतो. यामुळे ओडिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ओडिसाशी लागून असल्याने झारखंडमध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसू शकतो.

खाडीचे ढग डीप डिप्रेशनकडे जातील, ज्यामुळे धनबादमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे एक्सपर्ट डॉ. एसपी यादव यांनी सांगितले की, बिहारच्या जवळपास तयार झालेले लो प्रेशरचे फिडर ढगांच्या तुकड्यात मध्यप्रदेशकउे जात आहेत. फिडर ढगांचा ट्रॅक धनबादहून जात आहे. या कारणामुळे जोरदार गर्जनेहस अधून-मधून पाऊस होण्याची शक्यता राहील.

हवामानासाठी ऑक्टोबर महिना महत्वाचा
स्कायमेट वेदरनुसार, ऑक्टोबरचा महिना भारतात मोठे बदल घेऊन येऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये सामान्यपणे बंगालच्या खाडीत मध्यमागांबर मौसमी सिस्टम विकसित होते आणि हे पश्चिम तसेच उत्तर-पश्चिम दिशेत पुढे जात ओडिसा तसेच आंध्र प्रदेशाच्या किनार्‍यावर आदळतात. एकीकडे जेथे दक्षिण-पश्चिम मान्सून परत जात असतो, तर दुसरीकडे 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान दक्षिण भारतात उत्तर पूर्व मान्सून संकेत देतो.

याशिवाय मोठा बदल समुद्री वादळांच्या रूपात दिसतो. ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सध्या बंगालच्या खाडीत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे आणि विंडशियर कमी आहे, या कारणामुळे खाडी खुप सक्रिय आहे. बंगालच्या खाडीच्या उत्तर आणि मध्य भागात तापमानात नोव्हेंबरपासून घसरून होऊ लागते.

परंतु, दक्षिण भागात तापमान नोव्हेंबरमध्ये सुद्धा गरम असते. यासाठी नोव्हेंबरमध्ये कमी दाबाचे पट्टा, डिप्रेशन किंवा वादळ तयार होण्याचे लोकेशन बदलते आणि ते दक्षिण अंदमान समुद्र किंवा दक्षिण बंगालच्या खाडीवर विकसित होऊ लागते. यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तयार होणारी चक्रवादळं सामान्यपणे पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने पुढे जात दक्षिण आंध्र प्रदेश तथा तमिळनाडुच्या किनार्‍याकडे येतात.