देशात कोरोना बाधितांचा आकडा दुपारपर्यंत १०४५,महाराष्ट्रात १९३, केरळ १८२

नवी दिल्ली : देशभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून तिने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळी आणखी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता दुपारी १२ वाजेपर्यंत देशातील आकडा १०४५ पर्यंत पोहचला आहे. त्यातील ९३२ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून आतापर्यंत ८६ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

शनिवारी दिवसभरात देशभरात १४३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले होते. त्यावेळी देशातील बाधितांचा आकडा १०२९ वर गेला होता.

महाराष्ट्रात आज नव्याने ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून राज्यात १९३ जण बाधित आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये १८२ जण कोरोना बाधित आहेत. त्यानंतर कर्नाटकामध्ये ८१, तेलंगणा ६७ , उत्तर प्रदेश ६५, गुजरात ५८, राजस्थान ५५, दिल्ली ४९, तामिळनाडु ४२, मध्य प्रदेश ३९ जण कोरोना बाधित आहेत.

जम्मू काश्मीर या लहान केंद्र शासित प्रदेशातही काल ५ जणाना नव्याने बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून तेथे ३८ जण आतापर्यंत कोरोना विषाणूने बाधित आहेत.

पंजाब ३८, हरियाना ३५, लडाख १३या छोट्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यामानाने अजून आंध्र प्रदेश १९, पश्चिम बंगाल १८, बिहार १०,ओडिशा ३ या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित आहे.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी २८ मार्चला एकाच दिवशी १४३ जणांना कोरोना लागण झाल्याचे दिसून आले. २७ मार्च ला १५१, २६ मार्च ला ७८, २५ मार्च ला ८६, २४ मार्च ला ६६ जणांना तर, २३ मार्चला एका दिवशी १०२ जणांना लागण झाल्याचे दिसून आले होते.