Coronavirus : देशात ‘कोरोना’ बाधितांचा आकडा 25 लाखाच्या पुढं, गेल्या 24 तासात 65002 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे नवे रूग्ण दर दिवशी नवा विक्रम करत आहेत. मागील 24 तासात देशात कोरोना रूग्णांच्या संख्येने 25 लाखांचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी कोरोनाचे 65 हजार 2 नवी प्रकरणे समोर आली, तर 996 लोकांचा मृत्यू झाला. नव्या केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 25 लाख 26 हजार 192 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यानुसार, देशात आता कोरोनाच्या 6 लाख 68 हजार 220 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 49 हजार 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 18 लाख 8 हजार 936 लोक रिकवर झाले आहेत. देशात सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र दिसत आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची 12,608 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात कोविड-19 च्या एकुण प्रकरणांची संख्या वाढून 5,72,734 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, या दरम्यान कोरोनामुळे आणखी 364 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 19,427 झाली आहे. महाराष्ट्रात कोविड-19 चे 4,01,442 रूग्ण बरे झाले आहेत आणि 30,45,085 लोकांची टेस्ट करण्यात आली आहे.