Coronavirus : 24 तासात 105 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यु, पुणे जिल्ह्यात 1700 ‘कोरोना’बधित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोना पॉसिटिव्ह रुग्णांची संख्या अजूनही वेगाने वाढत असून गुरुवारीही पुन्हा एकदा शंभराहून अधिक पॉसिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील रुग्णात नव्याने १०५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या१७०० झाली आहे.

पुणे शहरात गुरुवारी नवीन ८६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १५०५ इतकी झाली आहे. त्यामुळे अतिसंक्रमित भागात आजपासून पुन्हा ३ दिवस कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या अतिसंक्रमित भागात केवळ १० ते १२ या वेळेत केवळ दुध खरेदीसाठी लोकांना घराबाहेर पडता येणार आहे.

शहरात उपचार घेणार्‍या रुग्णांपैकी ६० जणांची प्रकृती अत्यावस्थ आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११३ झाली असून नगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या ४३ झाली असून ग्रामीण भागात ३९ रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात कोरोना बाधित ६ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ९२ जणांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे. गुरुवारी दिवसभरात ४१ जण बरे झाले. आतापर्यंत ३०९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.