Coronavirus : देशात 24 तासात 3320 नवे रुग्ण तर 95 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 60 हजाराच्या टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात दररोज ३ हजारांच्या जवळपास नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. शनिवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासात देशभरात ३ हजार ३२० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या आता ६० हजारांजवळ पोहचली आहे. देशात आतापर्यंत ५९ हजार ६६२ कोरोना बाधित रुग्ण झाले आहे. त्यातील ३९ हजार ८३४ हे सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात ९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधित मृतांची संख्या १ हजार ९८१ झाली आहे.

देशात दररोज ३ हजारांहून अधिक रुग्ण दररोज वाढत असताना त्यामानाने कोरोना विषाणूतून बरे होण्याचा दर केवळ २९ टक्के आहे. गेल्या २४ तासात १ हजार ३०७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत देशभरातील १७ हजार ८४७ कोरोना बाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.