देशातील करोडपतींची संख्या वाढून झाली 97,689, IT रिटर्नच्या आकडयावरून झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2018-19 या आर्थिक वर्षात देशात करोडपतींच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली असून हि संख्या आता 97,689 वर पोहोचली आहे. अर्थमंत्रालयाच्या वतीने आणि आयकर विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हि माहिती मिळाली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात देशभरात कर भरणाऱ्यांची संख्या हि 81,344 इतकी होती.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आर्थिक वर्ष 2018-19 च्या आकडेवारीनुसार हि संख्या सांगण्यात आली आहे. यामध्ये फर्म्स, हिंदू एकत्रित परिवार तसेच वैयक्तिक नागरिकांचा समावेश आहे. जर सर्व प्रकारच्या करदात्यांचा यामध्ये समावेश केला तर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर भरणाऱ्यांची संख्या हि 1.67 लाख इतकी आहे जी 2017-18 च्या तुलनेत 19 टक्के अधिक आहे.

आकड्यांनुसार 15 ऑगस्ट 2019 पर्यंत 5.87 कोटी आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. तर 5.52 कोटी वैयक्तिक नागरिकांनी, 11.13 लाख हिंदू एकत्रित कुटुंबांनी, 12.69 लाख फर्म्सनी आणि 8.41 लाख कंपन्यांनी आयकर परताव्याचे अर्ज केले आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like