अवघ्या 42 रूपयांत ‘आजीवन’ पेन्शन, जोडले गेले 2.45 कोटी लोक !

पोलीसनामा ऑनलाईन : अटल पेन्शन योजना प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित असावे अशी इच्छा असते पण योग्य नियोजनाअभावी खूप त्रास होतो. दरम्यान, वृद्धावस्था सुरक्षित करण्यासाठी कोट्यावधी लोकांनी केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना निवडली आहे. जाणून घेऊया त्यासंदर्भात तपशीलवार …

जोडणाऱ्यांची संख्या जवळपास 2.50 कोटी

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानूसार (पीएफआरडीए) अटल पेन्शन योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या सुमारे 2.50 कोटी जवळ पोहोचली आहे.

ऑक्टोबरमध्ये 34. 51 टक्क्यांनी वाढ

माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस भागधारकांची संख्या 34.51 टक्क्यांनी वाढून 2.45 कोटी झाली आहे, ती आधीच्या ऑक्टोबर 2019 मध्ये 1.82 कोटी होती.

वयाच्या 60 नंतर पेन्शन
दरम्यान, अटल पेन्शन योजनेचे उद्दीष्ट म्हातारपणात उत्पन्न सुरक्षा प्रदान करणे आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर किमान निवृत्तीवेतनाची हमी दिली जाते. देशातील कोणताही नागरिक वयाच्या 18 ते 40 वर्षांच्या कालावधीत ही योजना घेऊ शकतो.

42 रुपयांपासून गुंतवणूक
जर तुम्ही गुंतवणूकीच्या रकमेबद्दल चर्चा केली तर तुम्ही फक्त 42 रुपयांनी सुरुवात करू शकता. मात्र, यासाठी भागधारकांचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या वयात जर तुम्ही दरमहा 42 रुपये गुंतवित असाल तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 1 हजार रुपये मिळतील. 210 रुपयांच्या योगदानावर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळतील. यासाठी वय केवळ 18 वर्षे असावे.

यासाठी संबंधित व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षानंतर किमान 1000 ते 5000 रुपयांच्या निवृत्तीवेतनाची हमी देण्यात आली आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे भागधारकाच्या मृत्यूच्या वेळी पेंशन त्याच्या जोडीदारास दिले जाते. एवढेच नव्हे तर दोघांच्या मृत्यूनंतर पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. पीएफआरडीए नूसार अटल पेन्शन योजनेद्वारे दोन वर्षांपूर्वी सुमारे 50 लाख भागधारक जोडले गेले आणि तिसऱ्या वर्षात ही संख्या दुप्पट होऊन एक कोटीवर पोहोचली. त्याचबरोबर चौथ्या वर्षात ही संख्या 1.50 कोटींवर गेली होती.