हातपायात ‘त्राण’ राहात नसेल तर करा हे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कधीकधी आपल्या हातपायात त्राण राहात नाही. किंवा मग हाताला किंवा पायाला मुंग्या येतात. त्यावेळी आपल्याला काहीच काम करता येत नाही. अगदी चालायला लागलो तरीही त्रास होतो. अशा वेळी आणि हे जास्त काही नाही म्हणून आपण दवाखान्यातही जात नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. जेणेकरू आपला त्रास लवकर कमी होईल.

हातापायात त्राण राहात नसेल तर करा हे घरगुती उपाय
१) ५० ग्रॅम नारळाच्या तेलात २ ग्रॅम जायफळ चूर्ण मिसळा आणि ते ज्या ठिकाणी त्रास होत असेल तिथे लावा. आराम मिळेल .

२) १ चमचा सुंठ आणि ५ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करा आणि त्या ठिकाणी लावा. असे केल्याने तुमच्या वेदना कमी होतील.

३) १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी मिस्क करून ते खाल्यास तुमच्या शरीराला आराम मिळेल.

४) आपल्या शरीरात रक्त संचार व्यवस्थित होत नसल्यामुळे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोज व्यायाम केला तर मुंग्या येणे, हातापायात त्राण राहाणं या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे रोज व्यायाम करा.