Number 7 Numerology 2021 : अंक 7 असणार्‍यांचा नवीन वर्षात वाढणार पगार, नव्या संधीसुद्धा मिळतील, वाचा तुमचे वार्षिक अंकफळ

पोलीसनामा ऑनलाइन – Number 7 Numerology 2021 : अंक ज्योतिषद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात घडणार्‍या घटना आणि त्यामुळे तुमच्या करिअरपासून लव्ह लाइफ आणि आरोग्यावर पडणार्‍या प्रभावाबाबत जाणून घेऊ शकता. अंक ज्योतिषच्या या प्राचीन विद्याद्वारे 2021 हे पूर्ण नववर्ष तुमच्यासाठी कसे जाईल, जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि कुठे तुम्हाला जास्त साधगिरी बाळगावी लागेल ते जाणून घेऊयात.

नववर्ष 2021
वर्ष 2021 चा एकूण योग 5 (2+0+2+1+=5) आहे आणि अंक 5 चा संबंध स्वतंत्र्यपूर्ण जीवन, प्रवास, परिवर्तन आणि नव्या लोकांशी ओळखीशी आहे. वर्ष 2021 मध्ये लोक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी उत्सुक असतील. मात्र, या दरम्यान जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी धैर्य आणि समजूतदारपणाचा परिचयसुद्धा द्यावा लागेल.

येथे सांगितलेला अंक भविष्यफळ तुमच्या मूलांकावर आधारित आहे आणि हा मूलांक तुमच्या जन्मतारीखेवरून काढला जातो.

जाणून घेऊयात आपल्यासाठी वर्ष 2021 कसे असेल –

वर्ष 2021 : अंक 7 चे भविष्यफळ (ज्यांचा जन्म 7, 16, 25 तारखेला झाला आहे)

नावाचे अक्षर : ज तसेच न

स्वभाव : तुमच्याकडे कोणतीही व्यक्ती, स्थिती किंवा कोणत्याही वस्तूचे खूपच बारकाईने विश्लेषण करण्याची जबरदस्त क्षमता आहे. एखाद्या गोष्टीबाबत दीर्घकाळ पूर्ण एकाग्रतेने सखोल अभ्यास आणि शोध घेणे तुमची आवड आहे. मूलांक 7 च्या व्यक्ती कल्पनाशिलसुद्धा असतात, ज्यांना केवळ आपल्या अटींवर जगणे पसंत असते.

अंक फळ : अंक 7 चा स्वामीग्रह केतू आहे. 2021 चा पहिला भाग तुमच्यासाठी आव्हानात्मक राहील, परंतु मे महिन्यानंतर तुमचे भाग्य संपूर्ण वर्षभर तुमच्या सोबत राहील, यासासाठी सुरुवातीच्या काळात धैर्य बाळगा. या कालावधीत कोणता मोठी निर्णय घेऊ नका, पण आगामी वाटचालीसाठी तयारी जरूर करा. मोठे निर्णय घेण्याची पद्धत आणि महत्त्वपूर्ण गोष्टी पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला यावर्षी सर्वाधिक लाभ होईल. हा दृष्टिकोन समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडेल तसेच नव्या संधीसुद्धा निर्माण करेल.

करिअर : अधिकारी तुमच्या कामामुळे समाधानी राहतील. वेतनात वाढ होण्याची शक्यताही आहे. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात. काही अनावश्यक गोष्टी आणि हालचाली तुमचे लक्ष सतत विचलित करतील. जर तुम्ही यावर नियंत्रण मिळवले तर 2021 मध्ये स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होण्याची प्रबळ शक्यता आहे.

आर्थिक स्थिती : तुमच्या आर्थिक स्थितीत 2021 च्या मध्यावर सुधारणा होण्यास सुरुवात होईल. संततीच्या बाबतीत तुमचा खर्च काही मर्यादेपर्यंत वाढू शकतो. परंतु, तुम्ही अन्य अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवू शकता, ज्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत तुमच्या बचतीतसुद्धा वाढ होईल. तुम्हाला काही आवश्यक कामांसाठी कर्जसुद्धा घ्यावे लागू शकते, परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर जास्त नकारात्मक परिणाम होणार नाही.

कुटुंब : वैवाहिक जीवनात काही छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मतभेदाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. अशा गोष्टी जास्त वाढवू नका, कारण हे मतभेद आपोआपच काही काळात समाप्तसुद्धा होतील.

आरोग्य : त्वचेसंबंधी काही छोट्या-मोठ्या समस्या होऊ शकतात. याशिवाय या वर्षात आरोग्याविषयी जास्त मोठी समस्या तुम्हाला भेडसावणार नाही, परंतु दुर्लक्ष करू नका. चांगल्या आरोग्यासाठी तळलेले-भाजलेले पदार्थ आणि जंक फूडपासून दूर राहा. ऑगस्ट महिना त्रासदायक ठरू शकतो.

शुभ अंक : 7, 10, 19, 28

शुभ रंग : पिवळा

शुभ दिवस : रविवार, सोमवार आणि गुरुवार

7 जन्मांकाच्या प्रसिद्ध व्यक्ती : महेंद्र सिंह धोनी, कॅटरीना कैफ, सर आयझॅक न्यूटन, पिकासो, करण जौहर, अरविंद केजरीवाल आणि शाहीद कपूर.