‘या’ अभिनेत्रीचे पैशामुळं होतायत हाल, घर चालवण्यासाठी विकले दागिने !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अगले जनम मोहे बिटीया ही कीजो आणी स्वरागिनी या मालिकेतील अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्या आयुष्यात तिला खूप अडचणींना सामना करावा लागला आहे. तसे तर हे चढ उतार प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात मग तो सामान्य माणून असो वा सेलेब्रिटी. नुपूर कडे दैनंदिन जीवनातील खर्चासाठीही पैसे नाहीत इतकी तिची अवस्था बिकट झाली आहे.

24 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव बँकेला नोटीस पाठवली होती. आरबीआयने या बँकेच्या देवाण घेवाणीवर 6 महिन्यांसाठी काही प्रतिबंध लावले आहेत. यानंतर पीएमसी बँक कोणतंही नवीन लोन घेऊ शकत नाही. बँकेचा ग्राहक 25000 हजारांहून अधिक रक्कम काढू शकत नाही. नुपूरची खातीही याच बँकेत आहे. त्यामुळे ती त्रासात आहे.

‘माझ्या आयुष्यभराची कमाई फ्रीज केली जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं’
एका इंग्रजी वृत्तानुसार, नुपूर म्हणते, “मी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. माझे दुसऱ्या बँकेतही माझी काही खाती होती. जी मी काही वर्षांपूर्वी या बँकेत हस्तांतरीत केली. माझे कुटुंबीय, पती, ननंद, बहिण, सासू, आई आणि माझ्या आयुष्यभराची कमाई फ्रीज केली जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं.”

‘पैसे नसल्याने घरातील आजारी सदस्याला रुग्णालयात दाखल करू शकले नाही’
पुढे ती म्हणाली पैसे नसतील तर मी जगणार कशी. माझ्या स्वत:च्या कमाईवर रोक का आहे. मी टॅक्स भरते तरीही या अडचणीचा सामना मला का करावा लागत आहे. अलीकडेच माझ्या कुटुंबातील एक सदस्य गंभीर आजारी होता. परंतु मी त्याला रुग्णालयात दाखल करू शकले नाही. सध्या मी नर्स ठेवली आहे.”

‘गरजा भागवण्यासाठीही मला माझे सोन्याचे-चांदीचे दागिने विकावे लागले’
नुपूर म्हणते, “आमचं कोणतंही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काम करत नाही. दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठीही मला माझे सोन्याचे आणि चांदीचे दागिने विकावे लागले. घरी पैसे नसल्याने मला असे करावे लागले. मी माझ्या को-अ‍ॅक्टरकडून 3000 रुपये उसने घेतले. आणखी एकाकडून मी 500 रुपये ट्रान्सफर करून घेतले आहेत. आतापर्यंत मी मित्रांकडून 50 हजार रुपये उसने घेतले आहेत. मला कळत नाही. कधी सगळं ठिक होईल.

Visit : Policenama.com