लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन
रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या मुलाला नोकरीचे आमिष दाखून त्यांची तब्बल साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी परिचारिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbd6e6cd-cf72-11e8-93b3-b154dd3ae150′]
सीमा मुक्ताजी नितनौरे (रा. श्रीराम निवास, कोलवडी, ता. हवेली ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या परिचारिकेचे नाव आहे. या फसवणुक प्रकरणी कैलास दौलत सावंत ( वय ३२, रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१७ दरम्यान घडली.
चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटला ७० हजार रुपयांचा ऐवज
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कैलास सावंत यांच्या आई चतुराबाई आजारी असल्याने त्यांना कोलवडी येथील साक्षी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले होते. या ठिकाणी सीमा नितनौरे या परिचारिका म्हणून काम करतात. या दोघींची ओळख झाली होती. एके दिवशी चतुराबाई यांनी माझ्या मुलास नोकरी मिळत नाही असे सांगितले. त्यावर सीमा हिने मी तुमच्या मुलाला रुग्णालयात नोकरीला लावते. त्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करावा लागेल, असे सांगितले. मुलाला नोकरी लागत आहे हे पाहून चतुराबाई यांनी ५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी ३ लाख ५० हजार रुपये दिले.
[amazon_link asins=’B00XYC94IA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d58bf2b2-cf72-11e8-9b47-bd6ed838cf22′]
त्यानंतर चतुराबाई यांचा मुलगा कैलास याने आपल्या भावास काम लागावे म्हणून वारंवार पाठपुरावा केला. परंतु, नितनौरे यांनी दाद दिली नाही. नोकरीस लावत नाही म्हणून कैलास यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर सीमा नितनौरे हिने एक लाख व दुसरा अडीच लाखांचा असे दोन धनादेश दिले. व ते वटतील अशी हमी दिली. सावंत यांनी ते दोन्ही धनादेश बॅक आॅफ इंडिया थेऊर शाखेत वटविण्यासाठी जमा केले असता नितनौरे यांचे खाते बंद केल्याच्या शेऱ्यासह परत आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करत आहेत.