धक्कादायक ! ‘कोरोना’च्या संशयावरून वॉर्ड बॉयनं डॉक्टर गर्लफ्रेन्डचा केला खून

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे, परंतु याची भीती आता लोकांच्या जीवावर येऊन ठेपली आहे. इटलीमध्ये अशाच एका घटनेत वॉर्ड बॉयने आपल्या डॉक्टर मैत्रिणीची हत्या केली कारण त्याने असा संशय व्यक्त केला की आपल्या मैत्रिणीमुळेच त्याला कोरोनाची लागण झाली. दोघेही दक्षिण इटलीमधील सिसलीतील मेसिना येथे कार्यरत होते, परंतु इटलीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर दोघेही कोरोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी कार्यरत होते.

इटली येथील सिसलीच्या मेसिना येथे काम करणारे डी पेस यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की त्याने आपली गर्लफ्रेंड लॉरेनची हत्या केली आहे. सिसली पोलिस घटनास्थळी दाखल झाली तेव्हा त्यांनी पाहिले की पेस ने तिच्या हाताची नस कापली होती. पेस ला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याला वाचविण्यात आले.

वॉर्ड बॉय डी पेसने पोलिसांना सांगितले की त्याच्या गर्लफ्रेंड मुळे त्याला कोरोना झाला आहे. त्याने सांगितले की त्याने केवळ आपल्या गर्लफ्रेंडला शिक्षा करण्यासाठीच तिची हत्या केली. मात्र नंतर पोलिसांनी दोघांचा तपास केला असता दोघांना कोरोना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे डी पेसने सांगितलेल्या कहाणीवर पोलिसांचा विश्वास नाही आणि पोलीस सध्या त्याबाबत चौकशी करत आहेत.

इटलीत कोरोनामुळे आत्तापर्यंत 13,915 लोकांचा मृत्यू

इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. आता पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांनी लॉकडाउन 12 एप्रिलपर्यंत वाढविले आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 13,915 लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे तर 115,242 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.