‘कोरोना’ रुग्णांवरील उपचारांसाठी नर्सने उतरवले चक्क डोक्यावरचे ‘केस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कोरोना’ संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी चिनी लोकं जिद्दीने कामाला लागले आहेत. प्रचंड मनुष्यबळ आणि वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाची कमाल कामगिरी चिनी लोकांनी पणाला लावली आहे. वुहान शहरात ‘कोरोना’चा पहिला रुग्ण आढळला आणि दरम्यान चीनच्या १४ शहरांमध्ये तसेच जगभरही त्याचा फैलाव झाला.

वुहान आणि परिसरात ‘कोरोना’ने थैमान घातले. वुहानवासीय या आजाराच्या विरोधात जिद्दीने लढत आहेत. चीनच्या पंतप्रधानांनी असेच धीराने उभे रहाण्याचा संदेश वुहानच्या भेटीत वुहानवासीयांना दिला. वुहानमध्ये अल्पकाळात रुग्णालय उभे करण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज झाला. वुहान विद्यापिठाच्या रेनमिन हॉस्पिटलमधील तीस वर्षीय शान क्षिया या नर्सने डोक्यावरचे लांबसडक केस कापून टाकले आहेत.

दरम्यान, प्रशासनाने येथील सुप्रसिद्ध अॅमेझमेंट पार्क पर्यटकांसाठी बंद केले आहे. चीनच्या पंतप्रधानांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण या आजाराविरोधात देत असलेल्या लढ्याच्या कहाण्या चीनमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.