‘ड्रीमगर्ल’ नुसरत भरूचाचे बिकीनीतील ‘हॉट’ फोटो ‘व्हायरल’, कमरेवर ‘टॅटू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रीमगर्ल अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचा सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने समुद्रकिनारी चिल करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खास बात अशी की, नुसरत या फोटोत बिकीनीमध्ये दिसत आहे. नुसरत खूपच ग्लॅमरस दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे नुसरतने आपल्या कमेरवरील टॅटूही फ्लॉन्ट केला आहे. अनेक फोटोत नुसरतने कँडिड पोज दिली आहे.

नुसरतने व्हाईट कलरची बिकीनी घातली आहे. या फोटोंमध्ये नसुरतचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. नुसरत व्हॅकेशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या नुसरतचे हे बिकीनीतील हॉट फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यात खास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे तिचा कमरेवरील टॅटू. तिने टॅटूने हॉटनेसचा तडका मारल्याने चाहते जणू घायाळ झाले आहेत.

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 2006 मध्ये तिने ‘संतोषी मा’ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिने जॅकी भगनानीचा ‘कल किसने देखा’ हा सिनेमा केला. नुसरतने ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केले आहे. यानंतर तिला मिळालेला सिनेमा म्हणजे ‘प्यार का पंचनामा’. या सिनेमाने तिला खूपच लोकप्रियता मिळाली. याचा दुसरा भागही रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन आणि तिची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती.

‘आकाशवाणी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमानंतर नुसरत शेवटची ज्या सिनेमात दिसली तो म्हणजे ‘ड्रीमगर्ल’. हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमात नुसरत आयुष्मान खुराना सोबत दिसली. याशिवाय ती राजकुमार राव सोबत तुर्रम खान सिनेमातही काम करत आहे. इतकेच नाही तर सिद्धार्थ मल्होत्राच्या मरजावा या सिनेमातही ती आयटम नंबर करताना दिसणार आहे.

 

visit : Policenama.com