अभिनेत्री नुसरत भरूचानं समुद्रात केली ‘जेट स्की’ची सफर, ‘पिंक-ब्लॅक’ बिकीनीत दिसली एकदम ‘कडक’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नुसरत भरूचा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बोल्ड बिकीनी फोटोंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसत आहे. चाहत्यांसाठी ती रोजच काही ना काही, बोल्ड फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती पिंक आणि ब्लॅक कलरच्या बिकीनीत दिसत आहे.

एका व्हिडीओत आणि नुसरतनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुसरत समुद्रात जेट स्कीमध्ये बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तिनं जेट स्की चालवण्याचा आनंद घेत आहे. याशिवाय आणखी एका फोटोत ती जेट स्कीवर झोपल्याचंही दिसत आहे. यात नुसरत कमालीची सेक्सी दिसत आहे. जेट स्कीचा व्हिडीओ शेअर करताना नुसरत म्हणते, “Just jet-skiing through life!I want to go back now”

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती तुर्रम खान या सिनेमात दिसणार आहे. नुकतीच आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात दिसली होती. तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.

https://www.instagram.com/p/BzwJvwdBPEi/

https://www.instagram.com/p/Bzm_fHjBXey/

https://www.instagram.com/p/BnWtB0WBKCZ/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/