खा. अभिनेत्री नुसरत जहाँने कपाळावर ‘कुंकू’, डोक्यावर ‘पदर’ अन् ‘मंगळसूत्र’ परिधान करून ओढला जगन्‍नाथाचा रथ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – खासदार झालेली अभिनेत्री नुसरत जहाँ कोलकात्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत सामील झाली आहे. नुसरत जहाँला प्रमुख पाहुनी म्हणून आमंत्रित केले आहे. तिथे तिने भगवान जगन्नाथची आरती देखील केली. रथ यात्रा मध्ये पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बनर्जी देखील उपस्थित होती. नुसरतने ममतासोबत भगवान जगन्नाथांचा रथ देखील ओढला. या रथ यात्रेत नुसरतचा पती निखिल जैन देखील सामील होता. नुसरतने पैरेट ग्रीन कलरची साडी घातली आहे. डोक्यावर पदर, कपाळावर सिंदूर, गळ्यात मंगलसूत्र आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत आणि खूप छान दिसते आहे. येथे प्रसारमाध्यमांशी झालेल्या संभाषणात नुसरतने तिच्यावर झालेल्या टीकांवर प्रतिउत्तर दिले.

तिने सांगितले की, ”मी प्रत्येक धर्माचा आदर करते”. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’ मला घेऊन मुद्दाम वाद केला जात आहे. नुसरत लाल चुडा, कपाळावर सिंदूर लावून संसदेत मध्ये शपथ घेण्यास गेली होती. नुसरतने कपाळावर सिंदूर लावले होते आणि त्यामुळे तिच्यावर फतवा काढला. परंतु तिने त्या गोष्टीवर सडेतोड उत्तर दिले. नुसरातची रिसेप्शन पार्टी ४ जुलै रोजी कोलकत्ता येथील आईटीसी रॉयल हॉटेल मध्ये होणार आहे. नुसरत आपल्या रिसेप्शन मध्ये कसलीच कमी येऊ देणार नाही. याची पूर्णपणे दक्षता घेत आहे. जेवणापासून ते खास पाहुण्यांना बोलवण्यापर्यंत सगळी तयारी ती स्वतः हा पाहत आहे.

नुसरत ने आपल्या रिसेप्शन पार्टी मध्ये राजकीय नेत्यांसोबतच चित्रपट जगातील मोठ्या कलाकारांना निमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुसरतची रिसेप्शन पार्टी कोणत्या तरी थीमवर आधारित असणार आहे. पण आतापर्यंत थीम काय असणार याची कल्पना नाही. नुसरतच्या लग्नात इटालियन, बंगाली, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ठेवण्यात आले होते. नुसरतच्या सासरकडची मंडळी जैन धर्माचे असल्याने ते शुद्ध शाकाहारी आहेत. म्हणून रिसेप्शन मध्ये शाकाहारी जेवणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

Loading...
You might also like