Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहॉं (Nusrat Jahan Marriage) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून नुसरत नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय झाली आहे. नुसरतला नुकतंच काही दिवसांपूर्वी बाळ झालं असून (Nusrat Jahan Marriage) तिच्या पहिल्या लग्नाच्या घटस्पोटची चर्चा रंगली होती.

 

 

नुसरतनं 2019 मध्ये निखिल जैन (nikhil jain) सोबत लग्न (Nusrat jahan marriage) केलं होत. त्या दोघांच लग्न तुर्कीमध्ये मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आलं. मात्र काही काळानंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नुकताच तिनं आता बंगाली अभिनेता यश दासगुप्ता (yash dasgupta) याच्या सोबत लग्न केल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. परंतु तिनं या चर्चांना पूर्णविराम दिला असून, सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिनं यश दासगुप्ता सोबत नव्या आयुष्याची सुरुवात केल्याचं बघायला मिळतं.

 

यश दासगुप्ताचा 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्यावेळी नुसरतनं त्याला एक अनोखी ट्रिट देऊन त्याचा वाढदिवस खास केला. (Yash Dasgupta) त्याच्या वाढदिवसाचे काही खास क्षण तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामध्ये एक केकचा फोटो शेअर करून त्यावर पती आणि बाबा असं लिहिलं आहे. त्यामुळे तिनं दुसरं लग्न केलं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिनं आणखी एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये (Nusrat Jahan Marriage) ती आणि यश डायनिंग टेबलवर बसलेले दिसत आहे. या फोटोला तिनं ‘हॅप्पी बर्थडे’ असं कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, नुसरतनं 26 ऑगस्टला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नुसरत आणि यश दासगुप्ता आता आई-बाबा झाले आहेत. मात्र या दुसऱ्या लग्नाबद्दल तिनं कुठेही बोभाटा केला नव्हता. म्हणून अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर टिका केली होती. मात्र सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिनं आपल्या नात्याची कबूली दिली आहे.

 

Web Title :- Nusrat Jahan Marriage | nusrat jahan confirm her relationship with yash dasgupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सोमेश्वर कारखान्याला माझं उसाचं कांडक येत नाही, पण… – अजित पवार

Ratan Tata Love Story | बिझनेसमध्ये यशस्वी ठरलेल्या रतन टाटा यांनी का केला नाही विवाह, कसे तुटले होते प्रेयसीसोबतचे नाते? जाणून घ्या

Healthy Morning Routine | शरीर आणि मेंदू ठेवायचा असेल निरोगी तर ‘या’ 6 सवयींनी करा दिवसाची सुरुवात; जाणून घ्या