‘बनारसी’ साडीमध्ये अफलातून ‘सुंदर’ दिसली नुसरत जहाँ, फोटो पाहून फॅन्स म्हणाले ‘ब्यूटीफुटी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली अ‍ॅक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत त्या चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच नुसरत यांनी काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. इंस्टावर त्यांचे लाखो चाहते त्यांना फॉलो करतात. नुसरत यांचे अनेकदा बोल्ड फोटोही समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गॉर्जियस लुकमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

नुसरत यांनी इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये नुसरत पिंक कलरच्या बनारसी साडीमध्ये दिसत आहे. नुसरत खूपच सुंदर दिसत आहेत. नुसरत यांनी मिनिमल मेकअप, आय लायनर आणि छान हेअर स्टाईल केली होती.

फोटो शेअर करताना नुसरत यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये नुसरत म्हणतात, “सौंदर्य चेहऱ्यावर नाही तर हृदयातल्या प्रकाशात असते.” चाहत्यांना नुसरत यांचा ट्रॅडिशनल लुक आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B49vAFtHUKx/

नुसरत यांनी 19 जून रोजी बिजनेसमन निखिल जैन सोबत लग्न केलं. तुर्कीमध्ये दोघांनी विवाह केला. खासदार झाल्यानंतर नुसरत चाहत्यांच्या अधिकच आवडत्या झाल्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/