… म्हणून अभिनेत्री खा. नुसरत जहाँने संसदेत शपथविधीनंतर सभापतींचे पाय ‘पकडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा खासदार निवडणूक विजयी झाल्यानंतर बंगाली अभिनेत्री नुसरत जहॉं खूपच चर्चेमध्ये आहे. यासोबतच त्या संसदमध्ये आपल्या अनेक अ‍ॅक्टिव्हिटीला घेऊन देखील चर्चामध्ये आहे. नुकतेच नुसरत यांनी एका मुलाखतीमध्ये काही गोष्टींची चर्चा केली आहे.

नुसरत जहॉंने यांनी खासदारकीची शपथविधी पुर्ण केल्यानंतर स्पीकरचे पाय धरले होते. यानंतर संसदमध्ये खूपच वेगळे वातावरण झाले होते. या गोष्टींबद्दल बोलताना या अभिनेत्री आणि टीएमसी खासदारने सांगितले की, ‘मला माहिती नव्हते की, माझ्या आधी कोणी असे केले असेल. हे खूपच नॅचरल होते. ते माझ्यापेक्षा मोठे आहे, आमच्या संस्कृतीमध्ये शिकवले आहे की, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मी त्यांच्याकडे जाणून त्यांचा आर्शिवाद घेतला होता. मला वाटत नाही की, याचा काही मुद्दा बनला पाहिजे.’

नुसरत जहॉं यांनी हे ही सांगितले की, हे करताना मी कोणतचा विचार केला नव्हता. नुसरत जहॉं यांना चर्चेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, राजकारणामध्ये विचार न करता पुढे चालताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना तर करावा लागणार नाही ना ? यावर बोलताना नुसरत म्हणाल्या की, ‘मी राजकारणामध्ये स्वतःला बदल्यासाठीच आले नाही तर जीवनात सकारात्मक बदलही आणण्यासाठी आले आहे. मला चित्रपटात अनेकदा आपली ओळख बदल्यासाठी सांगितले होते. मला हे ही सांगण्यात आले होते की, मला बंगाली चित्रपटात टिकून राहण्यासाठी आपले नाव देखील बदलायला पाहिजे पण हे सांगून देखील मी कधीच स्वतःला बदलले नाही. मी जशी आहे तसेच लोकांनी मला स्विकारावे. मला राजकारणात माझ्या पर्सनॅलिटीला ही बदलायचे आहे. ‘

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’