Nutrition Reasons | का लागते वारंवार भूक? ‘ही’ 9 कारणे असू शकतात जबाबदार; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nutrition Reasons | भूक लागणे शरीराची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र, काही लोकांना खाल्ल्यानंतर काही वेळातच भूक लागते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात या पाठीमागे काही विशेष कारण असू शकतात. ही (Nutrition Reasons) कारणे कोणती ते जाणून घेवूयात…

1. योग्य प्रमाणात प्रोटीन न घेणे –

शरीरात प्रोटीनच्या आवश्यक मात्रेची कमतरता असेल तर वारंवार भूक लागते. यासाठी प्रोटीन युक्त मीट, चिकन, मासे, अंडे सेवन करा.

2. पूर्ण झोप न घेणे –

पूर्ण झोप घेतल्याने भूकेचा संकेत देणारा घ्रेलिन हार्मोन कंट्रोलमध्ये राहतो. तर झोप कमी मिळाल्यास हे हार्मोन वाढते आणि वारंवार भूक लागते.

3. खुप जास्त रिफाईंड कार्ब्ज खाणे –

फायबर नसल्याने रिफाईड कार्ब्जयुक्त पदार्थ लवकर पचन होतात आणि लवकर भूक लागते. त्याऐवजी भाजी, फळे, शेंगा, कडधान्य खा.

4. डाएटमध्ये फॅट कमी असणे –

योग्यप्रमाणात फॅट असलेले पदार्थ आहारात न घेतल्यास लवकर भूक लागते. फॅटी फिश, कोकोनट ऑईल, आक्रोड, अवोकाडो, अंडे सेवन करा.

5. कमी पाणी पिणे –

पाणी कमी पिणार्‍यांना भूक लवकर-लवकर लागते. दिवसभर भरपूर पाणी प्या. पाणीदार फळे खा.

6. कमी फायबरवाले अन्न –

कमी फायबर असलेले पदार्थ सेवन केल्याने पोट लकवर रिकामे होते. भूक लागते. यासाठी ओट्स, फ्लेक्स सीड्स, बीट, संत्रे, नट्स खा.

7. जेवणावर लक्ष द्या –

घाई गडबडीत जेव करू नका. खाण्यावर लक्ष न दिल्यास भूक लवकर लागते.

8. खुप जास्त व्यायाम करणे –

खुप जास्त व्यायाम केल्याने खुप जास्त कॅलरी बर्न होतात. मेटाबॉलिज्म वेगाने होते आणि भूक लवकर लागते.

9 खुप जास्त दारू पिणे –

संशोधनानुसार खुप जास्त दारू प्यायल्याने भूक कमी करणार्‍या हार्मोनवर परिणाम होतो. विशेषता जेवणापूर्वी दारू प्यायल्यास जास्त परिणाम होतो. जे लोक नेहमी दारू पितात त्यांना भूक लवकर लागते. दारू भूक वाढवते, शिवाय मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम करते.

Web Title : Nutrition Reasons | health nutrition reasons why you are always hungry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update