‘न्याय योजना म्हणजे काँग्रेसचा गरिबीवरील सर्जिकल स्ट्राईक’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – न्याय योजना म्हणजे काँग्रेसचा गरिबीवरील सर्जिकल स्ट्राईक आहे असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीकाही केली.

जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मला जनतेशी खोटे बोलण्यात काही रस नाही. कारण खोटं हे काही दिवसांतच पकडलं जातं. मला तुमच्या सोबत 15-20 वर्ष काम करायचं आहे. न्याय योजनेसाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही. न्याय योजना म्हणजे काँग्रेसचा गरिबीवरील सर्जिकल स्ट्राईक आहे. देशात बारा हजाराच्या आत उत्पन्न असलेली एकही व्यक्ती नको मला नको आहे.” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “काँग्रेस भाजपासारखं केवळ खोटी आश्वासनं देत नाही. न्याय योजनेअंतर्गत प्रत्येक गरिबाला मिळाणाऱ्या 72 रुपयांविषयी आणि न्याय योजनेविषयी मी अर्थतज्ज्ञांशी 6 महिन्यांपूर्वीच चर्चा केली आहे आणि त्यानंतरच मी 72 हजाराचं आश्वासन दिलं आहे. या योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कोणतेही नुकसान होणार नाही.