Nylon Manja | नायलॉन मांजामुळे अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी, गळ्याला 10 टाके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीला (Makar Sankranti) बंदी असतानाही नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरले जातात. त्यामुळे पक्षी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नायलॉन मांजाने (Nylon Manja) दोन पोलीस कर्मचारी (Pune Police) जखमी झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (दि.17) दुपारी अग्निशमन (Pune Fire Brigade) कर्मचाऱ्याचा गळा कापला (Throat Cut). सुदैवाने ते बचावले असून त्यांच्या गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

अग्निशमन दलाचे कर्मचारी नवनाथ मांढरे (Navnath Mandhare) हे मंगळवारी दुपारी दोन वाजता भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्रात आले होते. त्यानंतर त्यांना ड्युटीसाठी कोंढवा येथे पाठवण्यात आले. ते कोंढवा येथे जात असताना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या गळ्यात मांजा आडकला. गाडी थाबवेपर्य़ंत त्यांचा गळा कापला. त्यांच्या गाडीचा वेग कमी असल्याने ते थोडक्यात बचावले. यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन कर्मचारी गणेश ससाणे (Ganesh Sasane) यांना फोन करुन सांगितले. त्यांनी लगेच ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे धाव घेतली. त्यांनी मांढरे यांना तातडीने बिबवेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्यावर दहा टाके (Stitches) घालण्यात आले आहेत.

दोन पोलीस कर्मचारी जखमी
दरम्यान, संक्रांतीला पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे (Nylon Manja) दुचाकीवरुन जाणारे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला. (Pune Crime News) महेश पवार (Mahesh Pawar) आणि सुनील गवळी (Sunil Gawli) अशी गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस असून रविवारी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने महेश पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेले सुनील गवळी यांच्या हाताला मांजा गुंडाळला गेल्यामुळे हात कापला.

 

Web Title :- Nylon Manja | another accident in pune with nylon manja fireman throat cut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो