समलैंगिक विवाह करणार्‍या न्यूझीलंड टीमच्या ‘सेटरथवेट’ आणि ‘ताहू’च्या घरात ‘गोंडस’ मुलीचा जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड क्रिकेट संघात समलैंगिक विवाह करणाऱ्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहु यांच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. ली ताहुने याबाबत माहिती दिली असून तिने मुलीचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, यात मुलीचा चेहरा दिसत नाही. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार सॅटरथवेट आणि सहकारी खेळाडू ली ताहु यांनी मार्च २०१७ मध्ये लग्न केले होते.

गुरुवारी ली ताहुने आपली मुलगी ग्रेस मेरी सॅटरथवेटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यावर लिहिले आहे की, “मी आणि एमी १३ जानेवारी रोजी जन्मलेल्या ग्रेस मेरी सॅटरथवेटच्या जन्माची घोषणा करण्यास उत्सुक आहोत.” आम्ही खूप कृतज्ञ आहोत. यापेक्षा जास्त आनंद आम्हाला कधीच झाला नाही, यापूर्वी सॅटरथवेट म्हणाली की, मी नशीबवान आहे की मला न्यूझीलंड क्रिकेटकडून खूप सहकार्य लाभले. मला वाटते की मी अजूनही क्रिकेटला बरेच काही देऊ शकेल आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या २०२१ च्या आयसीसी महिला विश्वचषकेकडे माझे लक्ष आहे.

महत्त्वाचे म्हणजे एमी आणि ली ताहु हे पहिले समलिंगी जोडपे नाहीत. न्यूझीलंडचा अष्टपैलू हेले जेनसन आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू निकोला हॅनकॉक, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार डेन वैन नीकेक आणि तीची सहकारी मारिजाने कैप यांचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like