NZ VS ENG | न्यूझीलंडच्या संघाने कसोटीत इंग्लडला धूळ चारत रचला इतिहास

पोलीसनामा ऑनलाईन – NZ VS ENG | वेलिंग्टन येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा अवघ्या 1 धावेने पराभव केला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 258 धावांची गरज होती. मात्र इंग्लंडच्या संघाला फक्त 256 धावा करता आल्या. या विजयाबरोबर न्यूझीलंडने कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. याअगोदरचा सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला होता. न्यूझीलंडच्या विजयात नील वॅगनरने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दुसऱ्या डावात त्याने 4 विकेट घेतल्या. यापूर्वी 1993 मध्ये अ‍ॅडलेड कसोटीत वेस्ट इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 1 धावाने पराभव केला होता. यानंतर आता 30 वर्षांनंतर न्यूझीलंडने इंग्लंडचा 1 धावेने पराभव करत इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. (NZ VS ENG)

या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु सामना सुरु होताच इंग्लंडने 80 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. पण जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करत इंग्लंडचे सामन्यात पुनरागमन केले. यानंतर बेन फॉक्सने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत इंग्लडला विजयाच्या आणखी जवळ नेले. मात्र फॉक्स बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संपूर्ण डाव गडगडला आणि इंग्लंडचा 1 धावेने पराभव झाला. (NZ VS ENG)

या सामन्यात नील वॅगनर हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
त्याने दुसऱ्या डावात 62 धावांत 4 बळी घेतले. नील वॅगनरशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने 3
विकेट घेतल्या. तसेच मॅट हेन्रीने देखील या सामन्यात 2 बळी घेतले. टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा हा पहिला विजय आहे.

Web Title :- NZ VS ENG | newzealand beat team england by 1 run in 2nd test match against nz vs eng

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरेंचा घणाघात (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | विधिमंडळ पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात, म्हणाले – ‘हा शुद्रपणा…’

Pune Crime News | ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई