खडकावरून समुद्रात पडलेल्या लेफ्टनंटचं कोस्ट गार्डच्या जवानांनी वाचवलं ‘जीवन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘वायू’ चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकले आहे. याच्या परिणामामुळे समुद्र सध्या खवळलेला आहे. असे असताना ‘कोस्ट गार्ड’ बचाव यंत्रणेच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. एका लष्करी अधिकाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला. सदर घटना आज दुपारी बारा वाजता घडली.

दृष्टी लाईफ गार्ड संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दक्षिण भागातील काद-ब-राम किल्ल्याजवळ समुद्रकिनाऱ्याजवळील खडकावर बसून उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील लष्कराचे लेफ्टनंट शिवम तिवारी हे समुद्र दर्शन करत होते. त्यावेळी त्यांचा गुळगुळीत खडकावरून पाय घसरला . त्यामुळे ते समुद्रात फेकल्या गेले. खवळलेल्या लाटांमुळे ते समुद्रात आतपर्यंत वाहून जाऊ लागले. आजूबाजूच्या लोकांना हि घटना कळल्यानंतर त्यांनी ‘कोस्ट गार्ड’ च्या आपत्ती विभागास याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ कारवाई करत कोस्ट गार्ड ने हेलीकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु केले.

दुपारी बारा वाजता घटनेची खबर मिळताच सुरु झालेले बचावकार्य पुढे दोन तास चालले. तब्ब्ल दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर जवानांना या लष्करी अधिकाऱ्यास वाचविण्यात यश मिळाले. दरम्यान वायू चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देत राज्यातील सर्व किनाऱ्यांवर समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा वेळी कोणतेही धाडस जीवघेणे ठरू शकते.

सिनेजगत

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?