शपथविधी ! राज्यपाल कोश्यारी संतापले, ‘या’ 2 मंत्र्यांना पुन्हा घ्यायला लावली ‘शपथ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मंत्रिपदाचा आज विस्तार होत आहे. यावेळी महाविकासआघाडीचे 36 मंत्री मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत. परंतु यादरम्यान काही मंत्र्यांनी आपल्या पद्धतीने शपथविधीवेळी शपथ घेण्याचा प्रयत्न केला, पण राज्यपाल त्यांच्यावर भडकले आणि आगे पुछे कुछ नही असे म्हणत मंत्र्यांना शपथ घ्यायला लावली. या दरम्यान के. सी. पाडवी या काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या पद्धतीने शपथ घेतली. परंतु त्यांच्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी संतापले आणि तुम्ही पुन्हा शपथ वाचा असे सांगत के सी पाडवी यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितले.

के सी पाडवी यांनी आपल्या पद्धतीने शपथ घेतल्याने राज्यपाल कोश्यारी त्यांच्यावर नाराज झाले. के सी पाडवी यांची शपथ घेऊन पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी सरकारी कागदावरील मजकूर पुन्हा वाचण्यास सांगून पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले. के सी पाडवी हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी अक्कलकुवा येथून विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यात ते विजयी झाले. के सी पाडवी हे आतापर्यंत 7 व्यांदा आमदार झाले आहेत.

के सी पाडवी यांनी शपथ घेण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांना शपथ घेताना राज्यपालांनी रोखले होते आणि स्पष्ट केले की आगे पिछे कुछ नही बोलना, शपथविधीसाठी सरकारी कागदातील मजकूरच वाचावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/