OBC Conference | ओबीसी परिषदेत अनेक महत्वाचे राजकीय ठराव ! सर्वच पक्षाती दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर, जाणून घ्या कोण काय म्हणाले

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – OBC Conference | ओबीसींच्या (OBC) प्रश्नावर चिंतन आणि मंथन करण्यासाठी लोणावळ्यात (Lonavala) आयोजित ओबीसी परिषदेला (OBC Council) सर्वपक्षीय ओबीसी नेते (OBC leader) एकत्र आले होते. रविवारी (दि. 26) समारोपाच्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) आणि महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्र लोणावळ्यात दिसून आले. यावेळी ओबीसी परिषदेत काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले. तसेच ‘जो ओबीसी का बात करेगा वही देश पे राज करेगा’ अशा घोषणा देत ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला सुरूवात केली. OBC Conference | many important political resolutions in obc conference bjp congress ncp leaders on the same platform

मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही : मुंडे

इमपेरिकल डाटा (Imperial data) गोळा करणे ही राज्य सरकारची (State Government) जबाबदारी आहे. राज्य शासनाने जबाबदारी केंद्रावर ढकलून चालणार नाही. मराठा समाजाला (Maratha society) राजकीय आरक्षणाची गरज नाही. आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज आहे. सर्व पद मराठा समाजाला मिळाली तरी त्या समाजातील तरुणांच्या पुढे प्रश्न आहे. पुर्नयाचिकेने साध्य काय होईल माहिती नाही. राज्य सरकार ओबीसी नेते सत्ताधारी आंदोलन मोर्चा काढून उपयोग नाही तर नेमका प्रश्न सोडविला पाहिजे, असे मुंडे म्हणाल्या.

भुजबळांवर कोणाचा दबाव ?

डाटा गोळा करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते करत नाहीत. त्यामुळे भुजबळांवर (Chhagan Bhujbal) नेमका कोणाचा दबाव आहे? असा प्रश्न भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी उपस्थित केला. राजकीय अभिभाषा घेऊन आलो नाही. आम्ही अंतर्मनातून ओबीसीसाठी आलो आहोत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्हाला जायला सांगितले. आम्ही राज्य सरकारसोबत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

समाजाची बाजू असेल तिथे पक्ष पहिला नाहीः नाना पटोले

ओबीसी समाज (OBC society) अनेक वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा करत आहोत. मात्र, अन्याय सहन करावा लागत आहे. समाजाची लिलाव करण्याची प्रक्रिया अद्यापही थांबली नाही. जर मी भूमिका घेतली तर माझी तिकीट कापले जाईल अशी भीती आजही मनात असल्याचे विधान नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. समाजाची बाजू असेल तिथे पक्ष पहिला नाही, काँग्रेस (Congress) विरोधात ही आंदोलन केल्याचे ते म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ओबीसी परिषदेत मांडलेले ठराव खालील प्रमाणे

1) 2011 मध्ये केंद्र सरकारने (Central Government) इंपेरिकल डेटा केला आहे, तो राज्य सरकारला द्यावा.
2) ओबीसी आरक्षण (OBC reservation) वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावेः – बबनराव तायवाडे.
3) ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशा स्वरूपाचा ठराव पारित करत आहोत – बाळासाहेब सानपय
4) रिव्हीव्ह पिटीशन दाखल करून इम्पेरियल डेटा केंद्र सरकारने द्यावा – बापूसाहेब भुजबळ
6) मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये – रामराव वडकुटे.

Web Titel :-OBC Conference | many important political resolutions in obc conference bjp congress ncp leaders on the same platform

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर