लक्षात घ्या ! ओबीसी दाम्पत्याचे ‘उत्पन्‍न’ १२,५०० असल्यास त्यांची मुलं शिष्यवृत्‍तीपासून ‘वंचित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘शिष्यवृत्ती’ संबंधित काही नवे नियम बनवले आहेत, या नियमानुसार जर शिष्यवृत्तीसाठी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या आई – वडिलांचे उत्पन्न महिन्याला १२,५०० रुपये एवढे असेल तर या प्रवर्गातील मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. त्यांना आर्थिक वर्ष २०१९ – २० दरम्यान मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

१२,५०० रुपये दरमहा उत्पन्न असल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी संसदेत ओबीसी शिष्यवृत्तीबाबत माहिती देताना सांगितले की, इतर मागास वर्गातील (OBC) आई वडीलांचे मिळून दरमाह उत्पन्न १२,५०० रुपये म्हणजेच १.५० लाख रुपये उत्पन्न असल्यास त्यांच्या मुलांना १० वी नंतर शिष्यवृत्ती मिळणार नाही. तर ओबीसी आई वडीलांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत असाल तर त्यांच्या मुलांना १० वी आधी देखील शिष्यवृत्ती मिळणार नाही.

भटक्या जमाती आणि ईबीसीला देखील मिळणार नाही लाभ

संसदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की सरकारकडून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आई – वडीलांचे उत्पन्न २ लाख रुपये असल्यास त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. तर ईबीसी समुदायातील आई वडीलांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा आधिक असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा मिळणार नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने