OBC Political Reservation | OBC राजकीय आरक्षणाबाबत आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण; मुख्यमंत्र्यांकडे आज सादर करणार, 8 फेब्रुवारीला कोर्टात सुनावणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – OBC Political Reservation | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Political Reservation) मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा (State Backward Classes Commission) अंतरिम अहवाल पूर्ण झाला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे या अहवालाचा मसुदा सोपवला जाणार आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारीला ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 8 फेब्रुवारीला अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

 

हा मसुदा आयोगाच्या पुण्यातील (Pune) काल (शनिवारी) झालेल्या बैठकीत अंतिम करण्यात आला आहे.
आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची बैठक पार पडली.
तर, अध्यक्ष निरगुडे यांची तब्येत बरी नसल्याने ते आयोगाच्या बैठकीत मुंबई (Mumbai) येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
आयोगाच्या इतर 8 सदस्यांनी प्रत्यक्ष बैठकीत उपस्थित राहून सरकारने दिलेल्या विविध विभागांतील ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचा डेटा संदर्भात बैठक घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण केला आहे. (OBC Political Reservation)

दरम्यान, आयोगाकडून अहवाल अंतिम करण्याचे काम शनिवारी पूर्ण केलेय.
आता हा मसुदा रविवारी मुंबईत “वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary) यांच्याकडे आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांकडून सादर केला जाईल.
8 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हा अहवाल सादर केला जाणार आहे.
त्याचवेळी यासंदर्भात सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान अहवालात करण्यात आलेल्या शिफारशींनुसार राज्य सरकार (Maharashtra Government) आणि राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) निर्णय घेईल, असं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- OBC Political Reservation | Maharashtra obc reservation marathi news cm thackeray will be handed over to the chief minister today hearing in the supreme court on february 8

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा