OBC Political Reservation Maharashtra | ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – OBC Political Reservation Maharashtra | सध्या राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ओबीसी आरक्षणाचा (OBC Political Reservation Maharashtra) प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर (Local Bodies Election) परिणाम झालाय. याच पार्श्वभूमीवर आज (दि.20) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निवडणुकांवर सुनावणी झाली. आजची सुनावणी फक्त ओबीसी आरक्षणावर असेल असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती खानविलकर (Justice Khanwilkar) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

 

यामध्ये वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगानं (Election Commission) पहावा, असे कोर्टाने स्पष्ट केले. दोन आठवड्यात निवणुका जाहीर करा, असे कोर्टाने स्पष्ट केल्यामुळे महानगरपालिका (Municipal Corporation) आणि इतर राज्यातील निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्या, असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे (State Government Advocate Shekhar Nafde) यांनी युक्तीवाद केला.
सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचं याचिकाकर्ते विकास गवळी (Vikas Gawli) यांनी सांगितले. (OBC Political Reservation Maharashtra)

बांठिया अहवालानुसार (Banthia Report) राज्यातील पुढील निवडणुका व्हायला हव्यात असे आमचेही मत आहे.
जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती नाही, असेही कोर्टानं स्पष्ट केलेय.
त्यामुळे आतापर्यंत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणुका होणार हे आता निश्चित झाले आहे.
पुढील दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

 

Web Title :- OBC Political Reservation Maharashtra | supreme court hearing on
obc reservation maharashtra obc reservation latest news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा