OBC Reservation | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC ला 27 % आरक्षण

मुंबई : पोलीसनामा आनलाइन – OBC Reservation | राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत पंचायत समितीच्या निवडणुकांच्या (Elections of local bodies) पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात ओबीसींना 27 टक्क्यांपर्यत आरक्षण (OBC Reservation) ठेवण्यासाठीचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. तर एकूण आरक्षण प्रमाण 50 टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही याबाबत सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात आलीय. याबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) झालेल्या बैठकीत राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाच्या (OBC Reservation) वटहुकूमाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तत्पुर्वी याआधी देखील याबाबत निर्णय घेण्यात आला होता. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत राहून आरक्षणाचा वटहुकूम काढण्याला सरकारकडून मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील 5 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. तर, नागरी स्थानिक संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत अधिनियमातही सुधारणाबाबतही निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका अधिनियमातील कलम 5 (A (4), राज्य महापालिका अधिनियमातील कलम 5 (A) (1) (C) व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम 9 (2) (D) मध्ये सुधारणा करुन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणारे 27 टक्के हे स्थिर प्रमाण बदलून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्यापर्यंत ठेवण्यास तसेच एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करण्यात यॆणार आहे.

हे देखील वाचा

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : OBC Reservation | 27% reservation to OBCs in local body elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update