Advt.

OBC Reservation | ‘संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्ष (Opposition) असलेल्या भाजपने (BJP) ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) शनिवारी राज्यात चक्काजाम आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला होता. यावरुन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे. आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

याला मी नेतृत्व म्हणत नाही – मुख्यमंत्री

संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळते तो खरा नेता. केवळ आदळआपट करणे याला मी नेतृत्व म्हणत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला होता. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.

… मग संवादातून मार्ग का काढत नाही ?

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) व मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन म्हणजे आदळआपट असं हिनवणे म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखं आहे. संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही ? असा सवाल भाजप आमदार प्रवीण दरेकर ((Praveen Darekar) यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Pune Police | सोशल मिडियाच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर पुणे पोलिसांची कारवाई

Former MLA Mohan Joshi | सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा – माजी आमदार मोहन जोशी

पीक कर्जाचे हफ्ते न फेडता आल्यानं शेतकर्‍याची आत्महत्या, सोनं गहाण ठेवून घेतलं होतं Loan

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : OBC Reservation | bjp leader pravin darekar attacks on cm uddhav thackeray over his statement on obc reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update