OBC Reservation | नाना पटोलेंंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘फडणवीस हे खोटं बोलण्याची मशिन, खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची परंपराच’

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडंल आहे. तसेच ओबीसीचं आरक्षण (OBC reservation) जाण्यासाठी भाजपा (BJP) जबाबदार असल्याची टीकाही पटोलेंनी केली आहे. पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वक्तव्याची जुनी क्लिप दाखवत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस हे खोटं बोलण्याची मशिन आहे. खोटं बोला रेटून बोला. त्यांची ती परंपरा आहे. धनगर समाजाचा प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असो. 5 वर्षे त्यांनी खोटेपणा केला. नौटंकी फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला कळलेला आहे. 4 महिन्यात मी आरक्षण मिळवून देतो, असे म्हणणा-या फडणवीसांनीच ओबीसींच आरक्षण काढलं आहे. त्यामुळे त्यांना आता बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका पटोले यांनी केली. OBC Reservation | congress leader nana patole blame on bjp about obc political reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केंद्र सरकारच्या (Central Government) आडमुठेपणामुळे ओबीसी समाजाचा घात झाला आहे.
त्यामुळे भाजपा हे उघड्यावर पडलेलं आहे. राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये, अशी आमची भूमिका आहे. राज्य सरकार स्वत: सुप्रीम कोर्टात गेले आहे.
सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून डाटा मागवून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे,
अशी मागणी केली आहे. तसेच फडणवीसांच्या काळात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे ग्रामविकास खात होत. त्यांच्याच खात्याने 2017 साली हे पत्रक काढलं होतं.
त्यांचे खातं कोण चालवत होते. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची खाती नागपूरच्या रेशीमबागेतून आलेली लोक चालवत होती. प्रत्येक विभागात त्यांचे लोक होते.
पंकजा मुंडेकडेही असाच एखादा माणूस असेल. खात हे चालवत नव्हते.
हे फक्त चेहरे होते. त्यांचे खातं चालवणारे दुसरे होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Web Title : OBC Reservation | congress leader nana patole blame on bjp about obc political reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | … तर दुसरी लाटच उलटू शकते, मुख्यमंत्र्यांचा गर्दी करणाऱ्यांना इशारा; सांगितला डेल्टा आणि डेल्टा प्लसचा धोका (व्हिडिओ)