OBC Reservation Empirical Data | ओबीसी राजकीय आरक्षण ! घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून डेटा संकलित करणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – OBC Reservation Empirical Data | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्य मागासवर्ग आयाेगातर्फे नमुना सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र, गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत राज्यभर घराेघरी सर्वेक्षण करून प्रश्न उत्तराच्या स्वरूपात इम्पिरिकल डेटा गाेळा (OBC Reservation Empirical Data) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या पद्धतीने जनगणना करण्यात येते त्याच पद्धतीनेच हे सर्वेक्षण होणार आहे.

 

समाज आणि जाती आधारीत हे सर्वेक्षण असणार आहे. यामध्ये कुटुंबातील एका सदस्याकडून प्रश्नाेत्तराच्या स्वरूपात असलेल्या फाॅर्ममध्ये इतर सदस्यांची माहिती नोंदवून घेतली जाईल. निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagade IASx) यांची या कामासाठी निवड केली आहे. विशेष म्हणजे जनगणनेच्या उत्कृष्ट कामासाठी केंद्र शासनाचा झगडे यांना पुरस्कार देखील मिळाला आहे.

या सर्वेक्षणातून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जातीची राजकीय मागासलेपणाची काय स्थिती आहे, हे तपासले जाईल. म्हणजे जर एखाद्या जातीची समजा पुणे महापालिकेत मागासलेपणाची स्थिती औरंगाबादमध्ये असेलच असे नाही. त्यामुळे प्रश्नावली अंतिम झाल्यानंतरच आयोग या कामासाठी शासनाकडे निधीची मागणी करेल, असे झगडे यांनी सांगितले. दरम्यान, डेटा गोळा करण्यासाठी सरकार किती प्रगणकांची नियुक्ती करते त्यावर याचा अहवाल अवलंबून आहे. साधारण ५० घरांसाठी एक प्रगणक नेमावे अशी शिफारस करण्यात येणार असून त्यांनी जमा केलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लागेल, असेही झगडे यांनी स्पष्ट केले. (OBC Reservation Empirical Data)

 

सर्वेक्षणाची प्रश्नाेत्तरे
औरंगाबाद येथील आयाेगाचे सदस्य ॲड. बी.एल. सागर किल्लारीकर म्हणाले की, पाच भागांत सर्वेक्षणाची प्रश्नाेत्तरे विभागली आहेत.
यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय मागासलेपण याबाबत माहितीचा समावेश असेल.
त्यासंदर्भात १९ जानेवारीला बैठक होणार आहे.
साधारण ही प्रश्नावली भरण्यासाठी एका व्यक्तीला एक दीड तास लागतो.
त्यामुळे प्रश्नावली भरण्यासाठी लोक तयार होतील की नाही याचा सल्ला झगडे यांच्याकडून घेण्यात येईल.
त्याच बरोबर डेटा गाेळा करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कोणते प्रशिक्षण द्यावे लागेल यावरही चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- OBC Reservation Empirical Data | OBC Reservation Empirical Data will be collected conducting house house survey

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा