OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation Maharashtra) प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) घेऊ नयेत अशी सर्वपक्षीय भूमिका आता समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नको, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत (Assembly) मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवण्यात येणार आहे. याबाबत आज सकाळी विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पुढच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाठिंबा दिला.

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation Maharashtra) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) खटला सुरु आहे. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने याआधी एक अध्यादेश (Ordinance) काढला होता. तो अध्यादेश सुप्रीम कोर्टात टिकला नाही. आता विधानसभेत सर्वानुमते नवा ठराव मंजूर झाला आहे. पण हा ठराव राज्य निवडणूक आयोग मान्य करतं का ? तसेच सुप्रीम कोर्टात या ठरावाला मान्यता देतं का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसींना वगळून घेऊ नयेत. हा ओबीसींवर अन्याय ठरु शकेल, अशी भूमिका अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. त्यामुळे जोपर्यंत इम्पीरिकल डेटा (Imperial Data) मिळत नाही तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी केली. या मागणीला सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली.

 

निवडणुका 4-6 महिने पुढे ढकलाव्यात – विजय वडेट्टीवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार ते सहा महिने पुढे ढकलल्या जाव्यात ही आमची भूमिका आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी म्हटलं आहे. निवडणुका पुढे ढकलल्यानंतर तरतुदीनुसार प्रशासक (Administrator) नेमला जाणार आहे.
मध्य प्रदेश सरकारनं (Madhya Pradesh Government) ठराव करुन निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस केली आहे.
4 ते 5 महिन्यात इम्पीरिकल डेटा गोळा करण्याचं काम करुन.
या काळात डेटा गोळा करण्याचे काम होईल आणि प्रश्न सुटेल अशी 100 टक्के खात्री असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

Web Title : OBC Reservation Maharashtra | deputy cm ajit pawar on hold elections without obc reservation maharashtra government resolution today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे