OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Reservation Maharashtra) राज्य सरकारची इम्पिरिकल डेटा (Imperial Data) मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर (local body elections) प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सुप्रीम कोर्टाने राज्यातील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता तूर्तास 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation Maharashtra) होणार आहे. ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागा या खुल्या गटासाठी असणार आहेत. पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील महापालिका, नगरपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचे भवितव्य ठरणार आहे.

 

ओबीसींच्या 27 टक्के राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation Maharashtra) सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. दरम्यान, केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्याने केली होती, ही याचिका कोर्टानं सुनावणीच्या सुरुवातीला फेटाळून लावली. यानंतर राज्य शासनानं (Maharashtra Government) इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला तसेच तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात असंही म्हटलं. मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय देताना निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच राज्यातील आगामी निवडणुकीत ओबीसींच्या 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निकाल दिला.

काय म्हटलं कोर्टाने?
सुप्रीम कोर्टानं निकाल देताना म्हटले की, खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात याव्यात. निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत. यासंदर्भात ओबीसींच्या 27 टक्के जागा खुल्या प्रवर्गातून लढवल्या जाणार असल्याचं नोटीफिकेशन निवडणूक आयोगानं आठवड्याभरात काढावं. दोन्हींचा निकाल निवडणूक आयोगानं एकत्रच लावावा.

 

21 डिसेंबरला मतदान
येत्या 21 डिसेंबरला या 105 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.
फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकांचे भवितव्य 17 जानेवारीच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे.

 

Web Title :- OBC Reservation Maharashtra | elections to be held in maharashtra without OBC reservation says supreme court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Udayanraje Bhonsle | भाजप खा. उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Home Loan Tax Deduction | मार्च 2022 पर्यंत होमलोनवर मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत, जाणून घ्या कशी

PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते