OBC Reservation | सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी (OBC Reservation) महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्राकडून (Central Government) ओबीसींचा इम्पिरिकल डेटा (Empirical Data) मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका (Petition) दाखल करणार आहोत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा (OBC Empirical Data) मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्राकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा (central keeps empirical data of OBCs)
ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) महत्त्वाचा असलेला इम्पेरीकल डेटा (Empirical Data) गोळा करण्याचं काम आयोगाला (Commission) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु कोरोनाचं (Corona) संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे.
त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करणार आहोत.
न्यायालयाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत.
तसेच कोरोना (Corona) संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टचं मतही जाणून घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Chitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक

इम्पेरिकल डेटासाठी केंद्राला 2 पत्र (2 letters to centre for empirical data)
ओबीसींचा (OBC Reservation) इंम्पेरिकल डेटा (empirical data of OBCs) मागण्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) दोन पत्र (Letter) लिहिली आहेत.
परंतु डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्रीही (CM) पंतप्रधानांना (PM) यासंदर्भात बोलले.
इंम्पेरिकल डेटा उपलब्ध न झाल्याने राज्यातील 40 त 45 हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला आहे.
यामध्ये महानगरपालिका (Municipal Corporation), सहकार क्षेत्र (Cooperative sector) ते ग्रामपंचायत (Gram Panchayat) आणि इतर जागा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

चिंतन बैठकीचे आयोजन (Conducting meditation meetings)
ओबीसींच्या (OBC) प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) बघावे,
यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठक (Conducting meeting) बोलवली आहे.
या बैठकिचे उद्घाटन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) करणार असून यात सर्व पक्षीय नेत्यांना बोलावणार आहे.
या बैठकिला 300 प्रतिनिधी येणार आहेत.
चिंतन बैठकीत ओबीसीच्या लढ्याबाबत पुढची दिशा ठरणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
या बैठकिला पंकजा मुंडे, नाना पटोले, संजय राठोड (Pankaja Munde, Nana Patole, Sanjay Rathod) यांना देखील आमंत्रित (Invitation) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : obc reservation maharashtra government will fill review repetition in supreme court vijay wadettiwar

हे देखील वाचा

Black Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंगसचा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे

पुण्यात खा. बापट यांचं नाव असलेली भाजपची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर