OBC Reservation Maharashtra | ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – OBC Reservation Maharashtra | स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी) आरक्षण (OBC Reservation Maharashtra) देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात (Divisional Commissioner Office) नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

 

राज्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (Panchayat Samiti), ग्रामपंचायत (Gram Panchayat)
आणि शहरातील महानगरपालिका (Municipal Corporations), नगरपालिका (Municipalities)
आणि नगरपंचायती (Nagar Panchayat) या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी (OBC Reservation Maharashtra),
व्हीजेएनटींना (VJNT) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) समर्पित आयोग गठित केला आहे.

 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांना मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

पुणे विभागासाठी (Pune Division) समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम शनिवार (दि. 21) रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
याबाबतची निवेदने शुक्रवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (Collector Office) येथे स्वीकारली जाणार आहेत.

 

ज्या नागरिकांना/या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांना निवेदने सादर करावयाची असल्यास त्यांनी आपले संपूर्ण नाव,
पत्ता, फोन नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस इ. माहिती शुक्रवारी (दि.20) सायंकाळी सहा पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे नोंदणी करावी,
असे पुणे महापालिकेचे उपायुक्त (निवडणूक) डॉ. यशवंत माने (Deputy Commissioner (Election) Dr. Yashwant Mane) यांनी सांगितले.

 

 

Web Title :- OBC Reservation Maharashtra | OBC Reservation Maharashtra VJNT reservation News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा