OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून राज्यभरात आंदोलन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर राज्य सरकारविरोधातील रोष वाढत चालला आहे. अनेक ओबीसी संघटना (OBC Association) जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आरक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या गुरुवारपासून (दि.18) राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान भाजपाने (BJP) याबाबत आंदोलन केले, ते या प्रश्नावर आक्रमक आहेत. समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. समता परिषदेचे हे आंदोलन केंद्र किंवा राज्य सरकार (State Government) विरोधात नसल्याचे भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून राज्यात ओबीसींना नोकरी, शिक्षण, राजकारणात आरक्षण लागू आहे. आता 25 वर्षानंतर कुणी तरी कोर्टात जातं अन् आरक्षण जास्त आहे सांगत. यापूर्वी जेव्हा केंद्र सरकारकडून दलित, आदिवासी समाजाला निधी दिला जातो तसा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे अशी मागणीही केली आहे. पण ओबीसींची लोकसंख्या नसल्याने निधी दिला जात नसल्याचे भुजबळ म्हणाले. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी वारंवार केली जाते. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत आग्रह देखील धरला होता, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्यात मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतल्या.
मुख्यमंत्र्यांनी आजही बैठक बोलवली आहे.
तसेच मुख्यमंत्री याबाबत पंतप्रधान मोदींनाही भेटले आहेत.
ओबीसीना आरक्षण द्यायचे तर डाटा अन् जनगणना हवी.
तसेच फडणवीस सरकारनेही केंद्र सरकारकडे याबाबत डाटा मागितला होता.
पण केंद्र सरकारने तो दिला नाही. आमचे सरकार आले अन् लॉकडाऊन लागले.
त्यानंतर अचानक 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला.
याचा परिणाम महाराष्ट्रातील 55 ते 60 हजार स्थानिक स्वराज्य संस्थांचा जागांवर होणार आहे.
कोर्टाने सांगितले जोपर्यंत डाटा आम्हाला देत नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही.
आता महापालिका(Municipal Corporation), नगरपालिका (Nagarpalika), जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील, त्यात ओबीसींना आरक्षण (OBC reservation) राहणार नाही.
घरोघरी जाऊन डाटा गोळा करायचा आहे. पण कोरोना काळात घरोघरी जाणार कस असे भुजबळ म्हणाले.

Wab Title :- OBC Reservation | ncp leader chhagan bhujbal organization on the streets for obc reservation agitation across the state from tomorrow

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये