OBC reservation | जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘OBC चे नेतृत्व संपवणारेच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढताहेत’

लातूर न्यूज (Latur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्यात सत्ताधारी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजप (BJP) करत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील( Jayant Patil) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील ओबीसी (OBC) नेत्यांचे नेतृत्व संपवण्याचे काम भाजपने केले आहे, तेच भाजप आज ओबीसींच्या बाजुने गळा काढत आहेत याच्यासारखा दुसरा विरोधाभास नाही, अशा शब्दात पाटील यांनी भाजपवर टिकास्र सोडले. ncp leader jayant patil attack on bjp leader over obc reservation

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लातूर जिल्ह्यातील (Latur district) शिरुर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे (Nationalist Congress Office) उद्घाटन जंयत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते.
ओबीसी आरक्षणाच्या घोषणा देणा-या याच भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अडीच वर्षे तुरुंगात बसवले होेते.
तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसारखा (Eknath Khadse) ओबीसी नेता घरी घालवण्याचे काम भाजपने केल्याचा घणाघाती आरोपही पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न असल्याची भूमिकाही पाटील यांनी स्पष्ट केली.
दरम्यान जगाच्या पाठीवर आरक्षणाची कल्पना कुणी अस्तित्वात आणली असेल
तर ती लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांनी आणली,
अशा शब्दात पाटील यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

Web Title : OBC reservation | ncp leader jayant patil attack on bjp leader over obc reservation

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Chandrakant Patil । चंद्रकांत पाटलांचं छगन भुजबळांना जाहीर आव्हान, म्हणाले…